मुबई रेल्वेने प्रवास करण्यासाठी तुम्ही मध्य, हार्बर, पश्चिम अथवा ट्रान्सहार्बर असा कोणताही पर्याय निवडा. तुम्हाला खचाखच भरलेली गर्दी अनुभवावी लागणारच. त्यातही जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रवास करत असाल तर अधिकच. असा वेळी जर कोणी मोठ्या बॅग, सामना घेऊन डब्यात चढत असेल किंवा उगाचच दरवाजा अडवून बसला असेल तर मात्र प्रवाशांच्या संतापाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. असाच संतापजनक अनुभव प्रवाशांना तेव्हा आला जेव्हा कर्जत सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये महिला डब्याचा दरवाजा बंद स्थितीत आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे हा दरवाजा आतील प्रवाशांनी जाणीवपूर्वक बंद केल्याचे बोलले जात आहे. 12 डिसेंबर 2023 रोजी बदलापूर स्थानकात हा प्रकार घडला. ज्यामुळे प्रवाशांनी स्थानकात जोरदार गोंधळ घातला. (हेही वाचा, Train On Road In Mumbai: रेल्वे बोगीची वाहतूक करताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी, गांधी मार्केट जॅम)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)