Central Railway Local Train Update: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील, नामांकित अशा आदर्श स्कूलमध्ये तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्याने मुलींच्या स्वच्छतागृहात हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मुलींच्या संतप्त पालकांसह हजारो लोकांनी सकाळपासून लोकल रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन करून लोकल ट्रेन सेवा विस्कळीत केली होती. त्यानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या वळवण्यात आल्या. आता संध्याकाळी उशिरा बदलापूर-कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने ही माहिती दिली.

अहवालानुसार, सकाळी साडे दहा वाजल्यापासून नागरिकांचा रेल रोको सुरु होता. शाळेतील व्यवस्थापनाविरोधात बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने, संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला. त्यानंतर शाळेची तोडफोडही करण्यात आली. दरम्यान, शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  (हेही वाचा; Badlapur School Case: बदलापूर आदर्श शाळा घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची फडणवीसांची माहिती)

Train Service to Badlapur-Karjat Started-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)