Adarsh School Badlapur Sexual Assault Case: महाराष्ट्रातील बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा गुन्हेगार अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. सोमवारी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून गोळीबार केला. यानंतर पोलीस निरीक्षकाच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अक्षय शिंदे ठार झाला. अक्षय शिंदेला गोळ्या घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला शिवसेनेच्या एका नेत्याने मंगळवारी 51,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
ठाण्यातील मुंब्रा बायपासजवळ सोमवारी सायंकाळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने आत्मसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे सेनेचे कल्याण पूर्व शहराध्यक्ष महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले. तसेच निलेश मोरे यांना शिवसेना कल्याण पूर्वेच्या वतीने 51 हजार रुपयांचे बक्षीसदेखील देण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यभरातील अनेकजण खूश आहेत. विशेषत: बदलापूरमध्ये या चकमकीबद्दल लोकांना आनंद झाला आणि त्यांनी अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. तसेच पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. कल्याण शहरातही आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या एन्काउंटरवर आनंदोत्सव साजरा केला. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'माझा मुलगा बंदूक हिसकावू शकत नाही'; अक्षय शिंदेच्या मृत्यूवर आई-वडिलांची प्रतिक्रिया)
अक्षय शिंदेची हत्या करणाऱ्या पोलिसाला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर-
#BadlapurEncounter | Shiv Sena leader announces Rs 51,000 reward for cop who gunned down #AkshayShinde
Know more https://t.co/KpcopNTHCl #Thane #BadlapurCase pic.twitter.com/cdYf8RYT1v
— The Times Of India (@timesofindia) September 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)