Rameshwaram Cafe Blast Case: बेंगळुरूमधील रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांवर केंद्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA) ने 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने कॅफेमध्ये आयईडी लावणारा मुसावीर हुसेन शाजिब आणि कटात सहभागी असलेला अब्दुल मतीन ताहा या दोन आरोपींची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. हे दोघेही 2020 च्या दहशतवाद प्रकरणात आधीच वॉन्टेड आहेत. यासह गुरुवारी एनआयएने बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली. मुजम्मिल शरीफ नावाचा हा सूत्रधार तीन राज्यात 18 ठिकाणी शोध घेतल्यानंतर पकडला गेला. मुजम्मिलने स्फोटासाठी उपकरण, पैसे आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या आणि रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेवल्यानंतर मुसावीरला पळून जाण्यात मदत केली होती. रेस्टॉरंटमध्ये स्फोटक असलेली बॅग ठेवणारा मुसावीर शाजेब हा अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आणखी एक व्यक्ती अब्दुल मतीन ताहा हा देखील एनआयएला हवा आहे. (हेही वाचा: BSP MLA Raju Pal Murder Case: राजू पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद टोळीतील सहा जणांना जन्मठेप, तर एकाला 4 वर्षे कारावासाची शिक्षा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)