Law gavel lights प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

BSP MLA Raju Pal Murder Case: बसपा आमदार राजू पाल (BSP MLA Raju Pal) यांच्या हत्येप्रकरणी लखनऊच्या सीबीआय न्यायालयाने सातही आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची (Life Imprisonment) तर एकाला चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पोलिस कोठडीत मरण पावलेले अतिक अहमद आणि अशरफ यांचीही राजू पाल हत्या (Murder) प्रकरणात नावे होती. आता उर्वरित सर्व 7 आरोपी आबिद, फरहान, जावेद, अब्दुल कवी, गुल हसन, इसरार आणि रणजीत पाल यांना दोषी घोषित करण्यात आले आहे.

लखनौच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजू पाल हत्याकांडातील सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची तर फरहानला चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 19 वर्षांपूर्वी 25 जानेवारी 2005 रोजी प्रयागराजच्या धुमनगंजमध्ये तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (हेही वाचा -Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या मारेकऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

काय आहे नेमकं प्रकरण?

विधानसभा निवडणुकीत माफिया अतिक अहमदचा भाऊ अश्रफ यांचा पराभव केल्यानंतर राजकीय वैमनस्यातून राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. अतिक अहमद आणि अशरफ यांनी प्रयागराजमध्ये राजू पाल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली. 2004 मध्ये राजू पाल बसपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि अतिक अहमद यांचा भाऊ अश्रफ यांचा पराभव झाला होता. (हेही वाचा - Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक)

दरम्यान निकालानंतर 3 महिन्यांत 25 जानेवारी 2005 रोजी अतिक टोळीने राजू पाल यांच्यावर हल्ला केला. 25 जानेवारी रोजी आमदार राजू पाल एसआरएन हॉस्पिटलमधून बाहेर पडले होते. त्यांच्या ताफ्यात एक क्वालिस आणि एक स्कॉर्पिओ गाडी होती. राजू पाल स्वतः क्वालिस कार चालवत होते आणि रुखसाना त्यांच्या शेजारच्या सीटवर बसली होती. राजू पाल जीटी रोडवर पोहोचताच एका स्कॉर्पिओ कारने त्यांना ओव्हरटेक केले आणि राजू पाल यांच्यावर गोळीबार केला. यात राजू पाल यांच्या छातीत गोळी लागली. पाच हल्लेखोरांनी स्कॉर्पिओमधून उतरून राजू पाल यांच्यावर गोळीबार केला होता. (Atiq Ahmed Life Imprisonment: अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड; प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात निकाल)

या हल्ल्यात रुखसाना जखमी झाल्या. तसेच या हल्ल्यात संदीप यादव आणि देवीलाल या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. राजू पाल यांच्यावर 19 गोळ्या झाडण्यात आल्या. उमेश पाल या राजू पाल खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, तो राजू पालचा नातेवाईकही होता.