Photo Credit- X

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार( Badlapur Sexual Assault Case) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde)याचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना चकमक झाली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळ असलेली बंदूक हिसकावरून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या मृत्यूवर त्याच्या आईने प्रतिक्रिया देत 'माझा मुलगा बंदुक हिसकावू शकत नाही', असे म्हटले आहे. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ?', विजय वडेट्टीवार यांच्या कडून न्यायालयीन चौकशीची मागणी)

माझा मुलगा असं करु शकत नाही

अक्षय शिंदेच्या आईने टीव्ही 9 मराठीशी बोलताना माझा मुलगा असं करुच शकत नाही असं म्हटलं. माझ्या मुलाबद्दल काहीही बोलतील, तो असं करुच शकत नाही. तो रस्ता क्रॉस करतानाही घाबरत होता. मी त्याचा हात धरत असे. तो कसा काय गोळीबार करेल? असा प्रश्न अक्षय शिंदेच्या आईने विचारला आहे. तर, त्याच्या वडिलांनी प्रतिक्रीया देतना त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही तो असं कसं करेल असं म्हटलं आहे.

अक्षय शिंदेच्या वडिलांची प्रतिक्रीया

अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारुन टाकले आहे. त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही. मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार का? पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. अक्षय शिंदेला मी 3.30 वाजता भेटून आलो. आता मी बातमी पाहिली तेव्हा मला त्याच्या मृत्यूविषयी कळले. असे अक्षय शिंदेच्या वडिलांनी म्हटले आहे.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याने आदर्श शाळेतील( Adarsh School) दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. 12 आणि 13 ऑगस्टला ही घटना घडली. त्यानंतर आढवडाभराने प्रकरणा उजेडात येताच अख्ख बदलापूर पेटून उठलं. बदलापूरमध्ये बंद पुकारण्यात आला. शेकडो लोकांनी लोकल, कार्यालये, दुकाने बंद ठेवली होती.