Adarsh School Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
गेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शिंदे याच्यावर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
Adarsh School Badlapur Sexual Assault: बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा कारागृहातून घेऊन जाणाऱ्या वाहनात एन्काउंटर झाल्यानंतर, आता सहा दिवसांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सायंकाळी उल्हासनगर येथील स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. यासाठी पोलिसांनी स्मशानभूमीला घेराव घालणे, दरवाजा बंद केला होता. तसेच या अंत्यसंस्काराला विरोध करण्यासाठी शांतीनगर भागातील स्मशानभूमीत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांसह 34 जणांना ताब्यात घेतले. गेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शिंदे याच्यावर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. (हेही वाचा: Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना)
अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार-
प्रचंड पोलिसांच्या बंदोबस्तात अखेर अक्षय शिंदे याच्यावर उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारhttps://t.co/b4onbuKXQZ#AkshayShinde #Ulhasnagar
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

