Extraction 2: हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थची (Chris Hemsworth) फॅन फॉलोइंग जगभरात आहे. मार्वल चित्रपटांमध्ये 'थोर'ची भूमिका साकारणाऱ्या हेम्सवर्थने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरात ओळख मिळवली आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ख्रिस हेम्सवर्थचा आगामी चित्रपट 'एक्स्ट्रॅक्शन 2' (Extraction 2) जो थ्रिल आणि अॅक्शनने परिपूर्ण आहे तो आता ओटीटीला धूम ठोकण्यासाठी सज्ज आहे. 'एक्सट्रैक्शन 2' च्या रिलीजची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे, हा चित्रपट 16 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. द ग्रे मॅन आणि अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचे दिग्दर्शन करणाऱ्या रुसो ब्रदर्सने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. यासोबतच ख्रिस हेम्सवर्थसोबत अॅडम बेसा, डॅनियल बर्नहार्ट, गोलशिफ्तेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (हे देखील वाचा: Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)