साउथ फिल्म्सचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा बहुप्रतिक्षित 'लायगर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Liger Trailer Release) झाला आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होती. ट्रेलर मध्ये भरपूर अॅक्शन आहे. विजयचा नवा अवतार लोकांची मने जिंकत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेत विजय स्ट्रीट फायटर ते एमएमए फायटर असा प्रवास करणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)