अभिनेता विद्युत जामवाल (Vidhyut Jamwal) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. फार कमी चित्रपटांतून त्यांनी स्वत:ची चांगली ओळख निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा तो त्याच्या चाहत्यांमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट IB 71 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आपल्या अ‍ॅक्शन, फिटनेस आणि मेहनतीने इंडस्ट्रीत ठसा उमटवणारा अभिनेता विद्युत जामवाल पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट IB 71 लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना खुद्द अभिनेत्यानेच याबाबत माहिती दिली आहे. IB 71 ची सहनिर्मिती आदित्य शास्त्री, आदित्य चोक्सी आणि शिव चनाना यांनी केली आहे आणि गुलशन कुमार यांच्या T-Series Films आणि Reliance Entertainment द्वारे प्रस्तुत आहे. हा चित्रपट यावर्षी 12 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)