शेरशाह चित्रपटात पडद्यावर दिसणारी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. मंगळवारी दोघांनी ‘सात फेरे’ घेतले. दोघांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. आता सिद्धार्थ आणि कियाराचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही लग्नाच्या पोशाखात खूप सुंदर दिसत आहेत.

विशेष म्हणजे या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले नाही. आधी बातम्या येत होत्या की दोघे 6 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत, पण 6 फेब्रुवारीला बातमी आली की लग्न 7 तारखेला आहे. या लग्नाला शाहिद कपूर मीरा, करण जोहर, जुही चावला, अंबानी कुटुंबासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रिपोर्ट्सनुसार, लवकरच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी दिल्लीत येणार आहेत व 9 फेब्रुवारीला दिल्लीत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)