अभिनेता शाहरुख खान आज मुंबई विमानतळावरुन त्याच्या कारकडे जात असताना त्याच्याभोवती चाहत्यांनी आणि कॅमेरामनने गर्दी केली होती. त्यापैकी एकाने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी शाहरुख खान हात हलवत त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसला. शाहरुख खान याची ही कृती कॅमेऱ्यांनी टीपली. मात्र, शाहरुख खानची ही कृती अनेक नेटीझन्सना आवडली नाही. काहींनी शाहरुख खान किती उद्धट आहे, असे म्हणत प्रतिक्रिया दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)