Miss India USA 2023: भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023'चा किताब जिंकला आहे. मिस इंडिया यूएसए 2023 या 41 व्या स्पर्धेत अमेरिकेतील 25पेक्षा अधिक राज्यांनी भाग घेतला होता. मिस इंडिया यूएसए  ही स्पर्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांसाठी असते. यंदा या स्पर्धेत रिजुल मैनीने बाजी मारली आहे. सोशल मीडियावर रिजुल मैनीनचं कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत अमेरिकेतील 25 पेक्षा जास्त राज्यांनी भाग घेतला होता. वर्जीनियाची ग्रीष्टा भट पहिली उपविजेती ठरली आहे. तर नॉर्थ कैरालिनाची इशिता पाई रायकर दुसरी उपविजेती ठरली आहे. ही स्पर्धा न्यू जर्सी येथे झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)