Miss India 2020 च्या विजेतीची घोषणा झाली आहे. यंदा हा बहुमान 23 वर्षीय मानसा वाराणसी (Manasa Varanasi) या तरूणीने पटकावला आहे. 2019 ची मिस इंडिया सुमन रतन सिंह राव हीने मानसाला झगमगता क्राऊन देत तिचं अभिनंदन केले आहे. मानसा वाराणसी ही हैदराबादच्या तेलंगणा प्रांतातील रहिवासी आहे. दरम्यान बुधवार (11 फेब्रुवारी) च्या रात्री मिस इंडिया 202 स्पर्धा पार पडली आहे. मानसा वाराणसी ही फायनान्शिअल इन्फॉर्मेशन एक्सचेंज अॅनालिस्ट आहे. दरम्यान मानसा यंदा डिसेंबर 2021 मध्ये होणार्या 70 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे.
हरियाणाची मणिका शेओकांड हीला मिस ग्रॅन्ड इंडिया 2020 चा मान देण्यात आला तर उत्तर प्रदेशची मान्या सिंह यंदाची मिस इंडिया 2020 रनर अप आहे. मागील वर्षी मिस ग्रॅन्ड इंडिया 2019 ठरलेली शिवानी जाधब हिने मणिकाला मुकूट परिधान केला तर Miss India United Continents 2019 श्रेया शंकर हीने उत्तर प्रदेशच्या मान्या सिंह हिला मिस इंडिया 2020 रनर अपचा मुकूट दिला.
View this post on Instagram
विजेती मानसा वाराणसी
View this post on Instagram
Vasavi College of Engineering मधून मानसाने शिक्षण पूर्ण केलं असून तिला संगीत, योगा, निसर्गाची आवड आहे. यापूर्वी मानसाने मिस तेलंगणाचा देखील किताब पटकावला आहे.
मिस इंडिया ज्युरी पॅनेल अम्ध्ये अभिनेत्री नेहा धुपिया, चित्रांगदा सिंह, पुलकित सम्राट आणि Falguni व Shane Peacock होते. दरम्यान ओपनिंग राऊंड हा मिस वर्ल्ड आशिया 2019 सुमन राव ने सुरू केला. ही ग्रॅन्ड फायनल 28 फेब्रुवारीला कलर्ड टीव्ही चॅनेलावर टेलिकास्ट केली जाणार आहे.