‘भोला’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण (Ajay Devgan) व तब्बूने (Tabbu) ‘द कपिल शर्मा’ शो (Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. मार्च महिन्याच्या अखेरीस ‘भोला’ (Bhola) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये कपिलने अजय देवगणला ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देत अजय देवगण म्हणाला, “नाटू नाटू गाण्याला माझ्यामुळे ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे”. अजयच्या या उत्तराने सर्वच जरा वेळ आश्चर्यचकित झाले. त्यानंतर अजय पुढे म्हणाला, “जर मी नाटू नाटूमध्ये डान्स केला असता तर गाण्याला पुरस्कार मिळाला नसता”. असे म्हटल्यावर सर्वत्र एकच हशा पिकला.
पहा व्हिडिओ -
To ye Raaz hai #NaatuNaatuSong ko Oscar milne ka 😯 pic.twitter.com/P9GXv4sy7K
— Pooran Marwadi (@Pooran_marwadi) March 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)