Esha Deol And Bharat Takhtani Divorce: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलने 12 वर्षांपूर्वी बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. दोघांचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या 12 वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या दोन मुलांचे सर्वोत्कृष्ट हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि राहील.’ ईशा देओलने जून 2012 मध्ये भरतशी लग्न केले होते. मुंबईच्या इस्कॉन मंदिरात हा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. लग्नाच्या पाच वर्षानंतर, हे जोडपे एका मुलीचे आई-वडील झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये ईशाने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. (हेही वाचा: मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्या Poonam Pandey विरुद्ध Fir दाखल, मॅनेजरवरही कारवाई)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)