Dhanashree Verma and Yuzvendra Chahal Divorce: धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा अधिकृत घटस्फोट (Divorce) झाला आहे. या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून घटस्फोटाची चर्चा होती. धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची माहिती वकिलाने दिली आहे. गुरुवारी, दोघांचाही अधिकृत घटस्फोट झाला आणि वकिलाने याची पुष्टी केली. माध्यमांशी बोलताना या प्रकरणाशी संबंधित वकिलाने सांगितले की, 'घटस्फोट निश्चित झाला असून लग्न मोडले आहे.' क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सहा महिन्यांचा अनिवार्य कूलिंग-ऑफ कालावधी रद्द केला. आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. दरम्यान, आज धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल अधिकृतपणे वेगळे झाले आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)