सुपरस्टार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत बहुचर्चीत अॅनिमल चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महत्त्वाचे असे की, अभिनेता रणबिर कपूर आज 41 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी प्रेक्षकांना भेट दिली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर नव्या आणि हटके भूमिकेत दिसत आहे. या दिग्ग्दर्शकासोबत काम करण्याची रणबिर कपुरची पहिलीच वेळ आहे. शिवाय रश्मिका आणि दोघेही प्रथमच एकत्र कामकरत आहेत. अवघ्या 2 मिनिटे आणि 26 सेकंदांचा टीझर निर्मात्यांनी गुरुवारी लॉन्च केला. बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम यासह अनेक भारतीय भाषांमध्ये जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)