Aashram Season 4 Update: बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉबी देओल अॅनिमल चित्रपटासाठी चर्चेत होता. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निराला यांच्या आश्रम ४ या वेब सीरिजमधून झळकणार आहे. भोजपुरी चित्रपटांचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि आश्रम वेब सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणारा चंदन रॉय सन्याल याने सीझन 4 बद्दल मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत चंदनने सांगितले की, प्रकाश झा यांच्या 'आश्रम 4' या वेब सीरिजचे काम पूर्ण झाले असून ही वेब सिरीज याच वर्षी रिलीज होणार आहे.पंरुतु अधिकृत घोषणा अद्याप आली नाही. या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, आदिती पोहनकर आणि तुषार पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ( हेही वाचा- Ram Charan आणि 'पुष्पा' दिग्दर्शक Sukumar एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)