Youtube वर प्रसिद्धीसाठी त्याने बहिणीला किस केल्यानंतर, आता आईसोबतचा Lip to Lip Kiss व्हायरल (Video)
YouTuber kisses mom for prank video (Photo Credits: Video grab)

सध्या लोकप्रिय यूट्यूबर ख्रिस मोनरो (Chris Monroe), ‘कोणतीही पब्लिसिटी ही चांगलीच पब्लिसिटी’ या तत्वानुसार काम करत आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी, ख्रिसने  PrankInvasion या आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये ख्रिस चक्क आपल्या बहिणीचे चुंबन घेताना दिसून आला होता. ख्रिसचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. अनेक लोकांनी ख्रिसच्या या गोष्टीबाबत टीका केली होती. आता परत एकदा ख्रिस अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. आता ख्रिसने चक्क आपल्या आईचे चुंबन घेतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ख्रिसचा हा एक नवीन Prank व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ख्रिस आपल्या आईसोबत लिप टू लिप किस (Lip to Lip Kiss) करताना दिसत आहे. आधी अशा प्रकारचा व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याची आई तयार नव्हती, मात्र ख्रिसने शेवटी तिला यासाठी तयार केलेच. याबाबत ख्रिस म्हणतो, 'अशाप्रकारे आपल्या आईला किस करणे हे अतिशय विचित्र आहे, मात्र फक्त या यूट्यूब व्हिडिओसाठी आम्ही हे करत आहोत'. आतापर्यंत या व्हिडिओला साडेआठ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा: बॉलीवूडमधील काही विवादित kiss; वडील आणि मुलीचा हा किस ठरला सर्वात वादग्रस्त)

मात्र या व्हिडिओमुळे परत एकदा ख्रिसला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. अनेकांनी ख्रिसचे व्हिडिओ हटवावे अशी मागणी केली आहे. ख्रिसला जशी हवी तशी लोकप्रियता या व्हिडिओला मिळाली नाही. दरम्यान ख्रिस मोनरो हा कॅलिफोर्निया  (Californian) येथील रहिवासी आहे. आतापर्यंत त्याने आपल्या चॅनलवरवर फक्त 34 व्हिडिओ पोस्ट केले आहेत, मात्र या व्हिडिओच्या टॉपिक्समुळे आज ख्रिसचे 3.8 मिलियन सबस्क्रायबर्स झाले आहेत.