बॉलीवूड आणि ‘किस’ (Kiss) चे नाते फार जुने आहे. पूर्वीच्या काळात किस शॉट दाखवण्यासाठी फुलांचा वापर केला जात असे, मात्र आता अभिनेत्री फार मोकळेपणाने किस शॉट देतात, इम्रान हाश्मी याच गोष्टीमुळे लोकप्रिय ठरला. आज किस किंबहुना लिप लॉक किसबद्दल सहसा कोणाचा आक्षेप नसतो. चित्रपटाचे कथानक असो वा एखा इव्हेंट अथवा पार्टी अनेक कलाकार पब्लीकली किस करताना आढळून आले आहेत. मात्र बॉलीवूडच्या इतिहासात काही किस असे आहेत जे विवादित ठरले आहेत. या किसमुले एकेकाळी चांगलाच गोंधळ माजला होता. प्रेक्षक आजही अशा अनपेक्षित अथवा ठरवून केलेल्या या किसची चर्चा करतान दिसून येतात. चला पाहूया कोणते आहेत हे किस
सिद्धार्थ माल्या आणि दीपिका पदुकोन
एप्रिल 2013 मध्ये कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर बंगळूरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरु होता. त्यावेळी रॉयल चॅलेंजरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताच सिद्धार्थने सर्वांसमोर दीपिकाला किस केले होते. सिद्धार्थने दीपिकाला केलेल्या किसची बरीच चर्चा झाली होती.
महेश भट्ट आणि पूजा भट्ट
होय वडील आणि मुलीच्या या किसमुळेच मोठा वाद झाला होता. महेश भट्ट यांनी स्टारडस्ट मॅगझिनसाठी मुलगी पूजासोबत हा लिप-लॉक किस दिला होता. या फोटोमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, महेश यांच्या यानंतरच्या एका वक्तव्याने या वादाच्या आगीत तेल ओतले होते. ‘पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते’, असे महेश म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड निंदा झाली होती.
राखी आणि मिका सिंग
2006 मध्ये राखी मीकाच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती. त्यावेळी मीकाने राखीला सर्वांसमोर किस केले होते. या घटनेमुळे राखी चांगलीच भडकली होती. मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती. या किसनंतर तर राखीची लोकप्रियता अजून वाढली. (हेही वाचा: मराठी सिनेमातील गाजलेले किसिंग सीन्स!)
बिपाशा आणि क्रिस्टियानो
रोनाल्डो बंगाली बाला बिपाशा बसूला किस केल्यामुळे चर्चेत आला होता. 2007 मध्ये दोघांचे एक छायाचित्र मीडियात प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये हे दोघे एकमेकांना किस करताना दिसत होते. एका पार्टीदरम्यान हे छायाचित्र क्लिक झाले होते. त्यामुळे बरीच चर्चा रंगली होती.
राम जेठमलानी आणि लीना चंदावरकर
2015 मध्ये ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी किशोर कुमारची पत्नी अभिनेत्री लीना चंदावरकर यांचे सर्वांसमोर चुंबन घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांच्या या किसचे किस्से चवीने चघळले गेले होते. याप्रकरणामुळे लीना चंदावरकर यांना बऱ्याच जणांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. राम जेठमलानी 93 वर्षांचे असले, तरी एव्हरग्रीन आहेत. मी त्यांच्या भाषणांची चाहती आहे, मला वाटते की वयाला कशाचेच बंधन नसते, असे लीना यांनी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले होते.