Kiss Day 2019 (Photo Credit: Youtube)

Valentine’s Day 2019: 'व्हेलेंटाईन वीक' (Valentine Week) मधील आजचा सातवा दिवस म्हणजे 'किस डे' (Kiss Day). 'किस' हे प्रेम व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. किसिंगची स्पंदन तुम्हाला किस केल्यानंतरही काही काळ जाणवत राहतात. किस फक्त लव्ह लाईफमध्ये रोमान्स भरतो असे नाही तर किस करणे आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते. मराठी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर आता किसिंग सीन्स पडद्यावर दाखवण्याइतपत मराठी सिनेमा व्याप्त झाला आहे आणि प्रेक्षकांनींही या गोष्टी स्वीकारल्या आहेत. तर आज 'किस डे' निमित्त जाणून घेऊया मराठी सिनेमातील काही गाजलेले किसिंग सीन्स.... 'किस डे'च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS

जोगवा

मराठी सिनेमातील पहिले किस 'जोगवा' सिनेमात पाहायला मिळाले. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांनी मराठी सिनेसृष्टीतील चौकट मोडत सिनेमाच्या मागणीखातर किसिंग सीन देण्याचं धाडस केलं. त्यांचे हे धाडस चांगलेच गाजले.

मितवा

मराठी सिनेसृष्टीतील स्टार हिरो स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'मितवा' सिनेमातील पॅशनेट किसिंग सीन चांगलाच गाजला.

पुणे 52

'पुणे 52' सिनेमातील मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड गर्ल सई ताम्हणकर आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्यातील हॉट किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला.

टाईमप्लीज

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी 'टाईमप्लीज' सिनेमात किसिंग सीन दिला होता.

1

याव्यतिरिक्तही अनेक कलाकारांनी सिनेमाची गरज म्हणून पडद्यावर किसिंग सीन्स दिले आहेत. 'मित्रा' सिनेमात तर मृण्मयी देशपांडे आणि वीणा जामकर या दोन अभिनेत्रींचा अनोखा किसिंग सीन पाहायला मिळतो.