
आज अवघ्या काही तासांमध्ये 2019 या वर्षाला अलविदा म्हणत सारे जग 2020 या नव्या वर्षाची सुरूवात करणार आहे. हळूहळू आपल्या आयुष्यात डिजिटल माध्यामांचा प्रभाव वाढला आहे. पूर्वी समाजमाध्यमं म्हणजे केवळ टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्र यांचा प्रभाव होता. मात्र आजकाल आपल्याला बातमी सर्वात आधी आपल्याला अवघ्या एका क्लिक इंटरनेटमुळे मोबाईल, टॅब, डेस्कटॉपवर मिळते. आता गोष्टी किती पटकन व्हायरल होतात यावरून तुमची लोकप्रियता ठरते. 2019 या वर्षामध्ये राजकारण, सिनेक्षेत्र, खेळ क्षेत्रात काही क्षण अविस्मरणीय ठरले आहेत. Year Ender 2019: रानू मंडल यांच्या गाण्यापासून ते ‘लँड करा दे’ ही फनी पॅराग्लायडिंग क्लिप, हे आहेत या वर्षीचे Top 5 Viral Videos.
नरेंद्र मोदी, रानू मंडल, प्रियंका चोप्रा ते पिवळ्या साडीतील पोलिंग ऑफिसर अशा अनेकांचे फोटो व्हायरल झाले. मागील वर्षभरात गाजलेल्या अशाच काही फोटोंची ही पुन्हा पहा एक खास झलक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय

2019 मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी दणदणीत विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचा हा भव्य विजय सेलिब्रेट करताना त्यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी विजयी मुद्रा दाखवतानाचा फोटो चांगलाच गाजला होता.
रानू मंडल मेकअप

एका रात्रीमध्ये जगप्रसिद्ध झालेली गायिका रानू मंडल यांनी डिजिटल युगात रातोरात स्टार होण्यामागे 'व्हायरल' होणं म्हणजे काय? हे अनुभवलं असेल. दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान टिपलेला रानू मंडलचा फोटो चांगलाच गाजला आहे.
पिवळ्या साडीमधील पोलिंग ऑफिसर

नलिनी सिंह नावाच्या पोलिंग ऑफिसरचे फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते.
शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये 79 वर्षीय शरद पवार यांचा दांडगा उत्साह पहायला मिळाला. भर पावसात त्यांनी दिलेल्या दमदार भाषणामुळे राजकीय खेळी पलटली. पण पावसात भिजून भाषण देणार्या शरद पवारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान मागील वर्षभरात फोटोंप्रमाणेच व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होते. यामध्ये पाकिस्तानातील चिमुकला 'पिछे देखो पिछे' डायलॉगने प्रसिद्ध झालेला अहमद ते पॅराग्लायडिंग करतानाचा तरूण असे अनेक व्हिडिओ मजेशीर होते. एक वर्ष अनेक आठवणी देऊन जातात. मग वाईट आठवणी मागे सारून चांगल्या आठवणींचा ठेवा पुढे घेऊन जात आता नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा.