Top 5 Viral Videos of 2019: ते दिवस गेले जेव्हा मनोरंजन फक्त टीव्ही मालिकांपुरतेच मर्यादित होते. आता इंटरनेटने मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांना टेकओव्हर केले आहे. म्हणूनच 2019 ला इंटरनेट इयर म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फणी मिम्सपासून ते अगदी वायरल व्हिडिओंपर्यंत अनेकांना सोशल मीडियामुळे वाव मिळाला. त्यात सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे रानू मंडल. अशा अनेक वायरल व्हिडिओ क्लिप्स आपल्याला या वर्षात पाहायला मिळाल्या. काही व्हिडिओ पाहताना आपण खळखळून हसलो तर काही व्हिडिओमुळे संतापाची भावना देखील आली. मात्र काही व्हिडीओंनी संपूर्ण देशाचं मन जिंकलं.आता आपण 2019 या वर्षाच्या शेवटाकडे पोहोचलो असताना, एक नजर टाकूया या वर्षी सोशल मीडियावर राज्य करणाऱ्या या सात देसी व्हिडीओंकडे.
रानू मंडल
या यादीतील पहिला व्हिडिओ रानू मंडल यांच्या आवाजातील “एक प्यार का नगमा है” या गाण्याचा व्हिडिओ. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साम्य असणारा रानू मंडलच्या आवाजाने लक्षावधी लोकांना आकर्षित केले. राणाघाट स्थानकातील प्लॅटफॉर्मवर गाताना शूट केलेला हा व्हिडिओ तिला इतकी प्रसिद्धी देईल याची त्या वेळी रानूला कल्पनाही नव्हती. हा व्हिडिओ या वर्षाच्या जुलै महिन्याच्या शेवटी सोशल मीडियावर आला. त्यानंतर रानूला हिमेश रेशमिया यांच्या हॅपी, हार्डी आणि हीर या चित्रपटासाठी गाणी गाण्याची संधी मिळाली.
माकड कपडे धुताना
Contagious behaviour. Learning to do from seeing it done by this primate is extremely amusing 😊😊 pic.twitter.com/vyBBRvmAyQ
— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 2, 2019
वानर आणि मानवांमध्ये समान वैशिष्ट्ये आहेत. आणि ज्या लोकांनाहे खोटा वाटत होते त्यांना याचे उत्तर मिळाले जेव्हा टिपिकल देसी पद्धतीने कपडे धुताना माकडाचा व्हिडिओ समोर आला.त्या वानराने इतके अचूकपणे कपडे धुतले की ते कपडे धुण्याच्या कौशल्यामुळे माणसाला स्वतःच्या क्षमतांवर संशय येईल.
भारतीय-अमेरिकन मुलगी टकीला शॉट्स पिताना
It was at this moment that my parents decided they were sending me back to India pic.twitter.com/MQ64wuYESO
— Misha Malik (@MishaMalik138) March 18, 2019
मिशा मलिक नावाच्या भारतीय-अमेरिकी मुलीचा वाढदिवस होता. व्हिडिओमध्ये ती तिच्या पालकांसोबत जेवायला हॉटेलमध्ये गेलेली दिसते. परंतु, तिच्या आईने ऑर्डर दिलेल्या डिश ऐवजी, वेटर टकीला शॉटचा पेला आणून टेबलवर ठेवतो . मीशाने तो ग्लास उचलते आणि तो टाकीला शॉट पिते. एवढंच नव्हे तर ती लिंबू पण जिभेवर पिळते. या प्रसंगानंतर एका ट्विटमध्ये, त्या मुलीने उघड केले की तिची आई हे सर्व बघून खूप हैराण आणि नाराज झाली. आणि मिशाला आपल्या मायदेशी परत पाठविण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला आहे. देसी नेटिझन्सनी या क्लिपवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्यात काहींनी असेच अनुभव शेअर केले आहेत.
लँड करा दे भाई
हा पॅराग्लाइडिंग व्हिडिओ प्रचंड गाजला. या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त गाजला तो म्हणजे हा व्हिडिओ. त्या व्यक्तीच्या "बस लँड करा दे भाई" या ओळीनंतर लोकांनी इतके मिम्स बनवले की, एका रात्रीत तो इंटरनेट स्टार बनला.
पाणी पिल्यानंतर माकड नळ बंद करतो
What a beautiful message for humans! pic.twitter.com/wTgK4b9uGF
— Dr. S.Y. Quraishi (@DrSYQuraishi) August 1, 2019
Year Ender 2019: या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले 'Top 5' Apps
माणसाला कसे वागायचे हे शिकवत माकडांनी यावर्षी जणू काही इंटरनेटवर राज्यच केलं. चेन्नईमध्ये पाण्याचं संकट उद्भवलं तेव्हा हा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओने भारतातील अनेक शहरांना जागृत होण्याची वॉर्निंग दिली आहे. वाहत्या नळाचे पाणी पिल्यानंतर माकड तो बंद करतो आणि तिथून निघून जातो. प्राणी किती जबाबदार असतात हे दाखवून या माकडाने अनावधानाने सर्व माणसांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला.