इंग्लंड मध्ये Rough Sex दरम्यान व्यक्तीकडून महिलेची हत्या, सुनावली चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका 32 वर्षीय व्यक्तीने इंग्लंड मधील डार्गिंग्टन येथे एका महिलेची रफ सेक्स दरम्यान गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आठ महिन्यांपूर्वी घडलेली आहे. याच वर्षात फेब्रुवारी महिन्यातील हे प्रकरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. सॅम पायबस (Sam Pybus) या आरोपीने त्याची पत्नी सोफी मॉस (Sophie Moss) हिची रफ सेक्स दरम्यान गळा आवळून हत्या केल्याचे मान्य केल्याचे गार्डियनच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.पायबस याने तपासकर्त्यांना सांगितले की, तो मॉस याच्या घरी सेक्स करण्यासाठी गेला होता. तर 6 फेब्रुवारी मॉस याची पत्नी झोपली होती. तो अत्यंत दारुच्या नशेत होता आणि त्याला आठवत ही नाही नेमके काय झाले. त्याने पुढे असे म्हटले की, मॉसचा गळा दाबल्याचे ही आठवत नाही. मात्र तो 7 फेब्रुवारीला सकाळी उठला असता त्याने तिला नग्न आणि ती काहीच हालचाल करत नसल्याचे पाहिले.

गार्डियनच्या रिपोर्ट्सनुसार, पायबस याने वैद्यकिय उपचारासाठी कोणताही फोन केला नाही. त्याऐवजी त्याने कारजवळ जात आता काय करावे असा विचार केला. परंतु त्याच्या 15 मिनिटानंतर त्याने स्वत:हून पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केले. मॉस ही ऐकटी राहत असून तिची मुल वडिलांसोबत राहत होती. पायबस सोबत सेक्स संबंध असले तरीही तिचे आणखी एका व्यक्ती सोबत रिलेशनशिप सुरु होते. (Condom Removal Without Permission: Sex दरम्यान पार्टनरच्या परवानगी शिवाय कंडोम काढणे म्हणजे अपराध, 'या' देशाने काढला नियम )

शवविच्छेदन रिपोर्टमध्ये असे समोर आले की, तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला असेल. शवविच्छेदनानंतर, पॅथॉलॉजिस्टने सांगितले की तिच्या जखमांना "एकतर खूप लांब किंवा फार जबरदस्तीने गळा दाबणे किंवा गळा दाबणे सुचत नाही ज्याला सक्रियपणे विरोध केला गेला". फिर्यादीने कोर्टाला सांगितले की, पायबस आणि मॉस मध्ये नेहमीच रफ सेक्सचे संबंध होते. तो तिला सेक्स दरम्यान डॉमिनेट सुद्धा करायचा पण तिला कधी दुखापत होईल इथपर्यंत त्याने कधी केले नव्हते.तिला सुद्धा सेक्स दरम्यान मजा येत असे. ती सुद्धा त्याला अधिक उत्तेजित करण्यासाठी प्रोत्साहन देत असे. महिला अधिकार कार्यकर्त्यांना शिक्षा सुनावली गेली नाही. "असे दिसते की एखाद्या महिलेचा गळा दाबून खून करणे अजूनही कायद्यात भयंकर गंभीर हिंसाऐवजी दुर्दैवी अपघात म्हणून पाहिले जाते, महिला आणि मुलींवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये "रफ सेक्स" संरक्षण वापरण्याच्या विरोधात मोहीम राबवणाऱ्या 'वी कान्ट कॉन्टेंट टू टिस इज'च्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.