कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. या उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत दिवसरात्र कार्यरत असणारे प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर सर्वच कोरोनाच्या धास्तीने घरात बसले आहेत. मात्र, या संकट काळात महावितरण कर्मचारी पथक अधिक परिश्रम घेताना दिसत आहेत. परंतु, महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या उषा जगदाळे (Usha Jagdale) सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण तसेच खंडीत झालेल्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्या चक्क विद्युत खांबावर चढत असल्याचे खालील व्हिडिओत दिसत आहे. त्यांचे हे कार्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"वीज महावितरणसारख्या जोखमीच्या क्षेत्रात काम करीत असले तरी आमचीही सामाजिक बांधिलकी ठरते. आम्ही कौटुंबिक जबाबरदारी पार पाडून हेच राष्ट्रीय कर्तव्य समजून ग्राहकांना अखंडीत सुरळीत वीज पुरवठा देण्याचे कार्य करीत आहेत", असे उषा जगदाळे एकदा पत्रकारांशी बोलाताना म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा- PIB Fact Check: शहरात 15 कि.मी. अंतरावर प्रवास करताना चालकाने हेल्मेट घालण्याची आवश्यकता नाही? जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मागील सत्य

ट्वीट-

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणाऱ्या उषा जगदाळे या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत एक लाइन वूमन म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याच्या जन्मलेली उषा जगदाळे यांच्याजवळ एथलीटचे कौशल होते. त्यानी शाळेत असताना खो-खो या खेळेत भाग घेतला होता. तसेच त्यांनी 11 सुवर्ण पथक जिंकले होते. महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय खो-खो संघाचे त्यांनी नेतृत्वदेखील केले आहे. मात्र, त्यांच्या परिवाराच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांचे करिअर बनू शकले नाही. मात्र, पुरुषांच्या बरोबरीने उन्हातान्हात लढून सर्वसामन्य जनतेला चोवीस तास नियमितपणे वीजपुरवठा पुरविण्याचे उत्कृष्ट काम करत असणाऱ्या उषा जगदाळे याची चर्चा संपूर्ण आष्टी तालुक्यात होत आहे.