Watch Video: धावत्या रेल्वेसमोरुन मुलांनी घेतल्या पूर आलेल्या नदीत उड्या; मग पुढे काय झाले? तुम्हीच पाहा

सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचचली जात आहेत. दरम्यान, सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून अधिक लाईक्स आणि प्रसिद्धी मिळवण्याकरिता अनेकजण जीवघेणा व्हिडिओ तयार करतात. अशाच एक धक्कादायक व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत काही मुले धावत्या रेल्वेसमोरून पूर आलेल्या नदीत उड्या घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, भरधाव रेल्वेसमोरुन पाण्यात उडी मारत काही मुले स्टंटबाजी करत आहेत. नदीत उडी मारण्यासाठी, पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काही मुले या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. जशी-जशी रेल्वे पुढे येत जाते आहे, तसे-तसे मुले नदीमध्ये उड्या मारत आहेत. हा व्हिडीओ बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथील आहे. तसेच अमित आलोक या नावाच्या ट्विटर हॅंडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलांना चांगलेच खडसावले आहे. हे देखीला वाचा- मुंबई: डोंबिवलीकर घरबसल्या करत आहेत लोकल ट्रेन प्रवासाचा सराव; व्हिडिओ पाहून तुम्हालाही आठवतील जुने दिवस (Video)

ट्विट-

मुंबई लोकल प्रवासात स्टंट दाखवू नका, स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात असे रेल्वेकडून वारंवार आवाहन केले जाते. पण अनेक तरुण त्याकडे दुर्लक्ष करुन लोकल प्रवासात स्टंटबाजी करत असतात. ज्यामुळे अनेकांना अपंगत्व आले असून काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.