व्हिडिओ: न्यूजीलैंड संसदेचं कामकाज सुरु असताना अध्यक्षांनी खेळवलं खासदाराचं बाळ, त्याला दूधही पाजले
New Zealand speaker Trevor Mallard | (Photo Credit: Twitter)

न्यूजीलैंड संसद अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरु अशताना चक्क खासदाराच्या बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला दूधही पाजलं. या अध्यक्ष महोदयांचा फोटो सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी न्यूजीलैंड संसद अध्यक्षांचे कौतुक केले आहे. तर, काहींनी मिष्कील टप्पणी करत फिरकीही घेतली आहे. त्याचे झाले असे खासदार टमाटी कॉफे (Tamati Coffey) हे पालकत्व प्राप्त झाल्यावर आपल्या बाळासोबत संसदेत पोहोचले. दरम्यान, कामकाज सुरु असताना ते आसनावरुन आपली बाजू मांडत होते. दरम्यान, त्यांचे बाळ हालचाल करत होते. ते पाहून सभागृह अध्यक्ष ट्रेवर मलार्ड (Trevor Mallard) यांनी त्या बाळाला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याला मांडीवर बसवले. इतकेच नव्हे तर, त्यांनी त्याला दूधही पाजले.

न्यूजीलैंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी पहिल्यांदा ही कृती केली होती. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेत त्या आपल्या बाळाला सोबत घेऊन पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या कृतीचे जगभरातून कौतुक झाले होते. दरम्यान, संसद अध्यक्ष ट्रेवर मलार्ड यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला. तसेच, टमाटी कॉफे यांना वडील झाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'खरेतर अध्यक्षांच्या खुर्चीवर केवळ अध्यक्षांनाच बसण्याचा अधिकार असतो. पण, आज एका व्हिआयपी पाहुण्याने माझी खुर्ची शेअर केली.' (हेही वाचा, World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर)

ट्विट

न्यूजीलैंडच्या संसद अध्यक्षांचे हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या छायाचित्राला (फोटो) आतापर्यंत हजारो लाईक्स आल्या आहेत. सोबतच त्यांचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियाही तितक्याच आहेत. एका युजरने तर म्हटले आहे की, न्यूजीलैंड हा छोटासाच देश आहे. पण, त्याने तो जगाला अनेक चांगल्या गोष्टी देत आहे.

ट्रेवर मलार्ड ट्विट

काही महिन्यांपूर्वीच केनियाच्या संसदेत महिला खासदार जुलेका हसन यांनी पाच महिन्यांच्या बाळाला सोबत आणले म्हणून संसदेने काढून टाकले होते. त्यांच्यावर ही कारवाई करताना कारण दिले होते की, संसदेच्या नियमानुसार संसदेच्या सभागृहात केवळ संसद सदस्यांनाच प्रवेश करण्याचा अधिकार आहे. इतर व्यक्तिंना नाही. दरम्यान, जुलेका यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संसदेने त्यांचे ऐकूण घेतले नाही. दरम्यान, न्यूजीलैंड अध्यक्षांचे मात्र जोरदार कौतुक होत आहे.