छत्तीसगढ: डान्सींग ट्रॅफिक पोलीस मोहम्‍मद मोहसिन शेख यांचे काम पाहून वाहनचालकही खूश, वाहतूक नियंत्रणात (Video)
Traffic Cop Mohd Mohsin Sheikh | (Photo Credits: ANI)

रस्त्यावरील वाहतूक नियंत्रीत करता करता आणि वाहनचालकांना शिस्त लावता लावता वाहतूक पोलीस अगदी थकून जातात. वाहने, हॉर्न, लोक आदींचे आवाज, वाहनांचा धूर, गर्दी, गोंगाट, कोलाहाल आदींमुळे त्रर वाहतूक पोलिसांच्या वैतागात अधिकच भर पडते. हे कमी की काय म्हणून सिग्नल तोडणारे, पोलीसांशी हुज्जत घालणारे चालक तर वाहतूक पोलिसांना चीड आणणारेच विषय. या सर्वांमुळे वाहतूक पोलिसावरचा ताण कैक पटीने वाढतो. पण, असे असले तरी, छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्याची राजधानी रायपूर (Raipur) येथील एक वाहतूक पोलीस (Traffic Cop) मात्र रस्ता आणि सोशल मीडिया आदींवर आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरतो आहे. ट्रैफिक कॉप मोहम्‍मद मोहसिन शेख (Mohd Mohsin Sheikh) असे या पोलिसाचे नाव आहे. त्यांचे अनेक व्हिडिओही सेशल मीडियात व्हायर झाले आहेत.

ट्रैफिक कॉप मोहम्‍मद मोहसिन शेख हे आपल्या खास वाहतूक नियंत्रणामुळे चर्चेत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी कोणत्याही चौकात त्यांची ड्युटी असेल तरीही ते आपल्या खास पद्धतीनेच वाहतूक नियंत्रण करतात. वाहतूक नियंत्रण करताना चालकांना ते आपल्या खास शैलीत म्हणजेच डान्स करुन चालकांना सूचना देतात. त्यांचा डान्स आणि त्यांनी दिलेल्या सूचना वाहन चालकांना इतक्या आवडतात की, वाहनचालकही त्या सूचनांचे पालन करत वाहतूकीचे नियम पाळतात.

मध्य प्रदेश राज्यातील डान्सींग कॉप रणजीत सिंह हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. रणजीत सिंह हेसुद्धा अशाच प्रकारे वाहतुकीला शिस्त लावतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत ट्रैफिक कॉप मोहम्‍मद मोहसिन शेख हेसुद्धा वाहतूक नियंत्रण करतात. सोशल मीडियावरही अनेकांना त्यांचा व्हिडिओ पसंतीस आला आहे. विशेष म्हणजे अनेक चालकही त्यांचे कौतुक करत त्यांना दात देत असतात. अशा पद्धतीने काम करुन मी आपल्या कामाचा आनंद घेत असतो, असेही ट्रैफिक कॉप मोहम्‍मद मोहसिन शेख सांगतात. (हेही वाचा, अगं बाई! हेल्मेट सापडत नाही, महिलेने डोक्याला घातला कुकर; छायाचित्र व्हायरल)

एएनआय ट्विट

दरम्यान, डान्सींग कॉप रणजीत सिंह आणि मोहम्मद मोहसिन शेख यांच्याप्रमाणेच इंदोरच्या रस्त्यावर एक डान्सींग ट्रॅफिक गर्लही पाहायला मिळते. एमबीए विद्यार्थीनी शुभी जैन ही आपल्या कलात्कमक डान्स प्रकाराने रस्त्यावरील ट्रॅफिक नियंत्रीत करत असताना दिसते. शुभी जैन ही पुणे येथील सिंबॉयसिस इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे. ती आपल्या हटके स्टाईलने वाहतूक नियंत्रीत करते.