Woman Gets Creative & Uses Rice Cooker Pot as Helmet | (Photo Credits: Facebook)

कोणत्या वेळी कोणाचे डोके कसे चालेल आणि त्या डोक्यातून कोणती 'आयडियाची कल्पना' बाहेर येईल सांगता यायचे नाही. एका महिलेने ट्रॅफीक पोलीस (Traffic Police) कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एक अजबच युक्ती लढवली. या महिलेने आयत्या वेळी हेल्मेट (Helmet) सापडले नाही म्हणून चक्क घरातला कुकर डोक्यावर घातला. आता बोला. आपल्याकडेही काही मंडळी ट्रॅफीक पोलीस दिसला रे दिसला की, कारवाई टाळण्यासाठी एकतर रस्ता बदलतात किंवा काहीतरी शक्कल लढवतात. या महिलेनेही असेच काहीसे केले. डोक्यावर कुकर परिधान केलेल्या या महिलेचा फोटो फेसबुक (Facebook) आणि इतर समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) जोरदार व्हायरल झाला आहे. काही लोकांचे म्हणने असे की, या महिलेने डोक्यावर परिधान केलेले भांडे हे कुकर नव्हे तर, पातेले आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार सिंगापूर (Singapore)येथे घडला आहे. हे छायाचित्र 12 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर अपलोड करण्यात आले. या छायाचित्रासोबत "Spotted a pothead on our roads." अशी कॅप्शनही लिहिण्यात आली आहे. आतापर्यंत 1.2 पेक्षाई अधिक लाईक्स या छायाचित्राला मिळाले आहेत. तर, 900 हून अधिक मंडळींनी हे छायाचित्र शेअर केले आहे. ROADS.sg नावाच्या फेसबुक अकाऊंटवर हे छायाचित्र शेअर पोस्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा, डेव्हिड लॉएड या छायाचित्रकाराने पटकावला ‘Wildlife Photographer Of The Year’ चा किताब)

दरम्यान, पुणे पोलिसांनीही नुकतीच हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न पुणे शहरभर राबवला होता. मात्र, पुणेकरांनी संघटीत विरोध दर्शवत हेल्मेटसक्ती हाणून पाडली. पोलिसांनी केलेली हेल्मेटसक्ती ही नागरिकांची सुरक्षा आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य होती, असे काही लोक सांगतात. पण, आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी पोलिसांनी जबरदस्ती करु नये असे सांगत या सक्तिला विरोधही केला होता. पोलिसांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची स्थापनाही पुण्यात करण्यात आली होती.