सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ भलतेच भयानक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती चक्क भलामोठा अजगर (Python) आपल्या खांद्यावर घेऊन जात आहे. किंग कोबरा (King Cobra) सापासारखाच हा एक भयानक अजगर. हा व्यक्ती थोडाही न घाबरता वैरणीचा एखादा भारा खांद्यावरुन घेऊन जावा अगदी तसाच सहजपणे हा अजगर (Giant Python) घेऊन जात आहे. सोशल मीडियावरसुद्धा अनेकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण सहज पाहू शकता हा व्यक्ती खांद्यावर अजगर घेऊन जाताना जराही घाबरत नाही. हा अजगरही साधासुधा नाही. चांगलाच भला दांडगा आहे. हा अजगर घेऊन हा पठ्ठ्या केवळ रस्त्यावरुनच चालत नाही तर चक्क जीनाही चढतो आहे. (हेही वाचा, Bhandara जिल्ह्यात लाखनी पोहरा शिवारात आढळला अजगर, सर्पमित्रांकडून काय केले पाहा)
व्हिडिओ
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर World_Of_Snakes_ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 37 हजार पेक्षाही लाईक्स पाहायला मिळत आहेतत. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, अशा अजगरापासून सावध राहिले पाहिजे. नाहीतर तुम्हाला धोका होऊ शकतो. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, अजगराला वाईट पद्धतीने पकडले आहे. असे कधीही कोणाला पकडू नये.