Snake Viral Video: जगात सापांच्या विविध प्रजाती आढळतात, त्यापैकी काही इतके धोकादायक आहेत की, ते क्षणात कोणाचाही जीव घेऊ शकतात. या सगळ्यांपैकी किंग कोब्रा साप हा सर्वात धोकादायक मानला जातो, कारण त्याच्या विषाचा एक थेंब कोणाचाही जीव घेऊ शकतो. जरी इंटरनेटवर सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ रोज दिसत असले तरी ते पाहून लोकांची अवस्था बिकट होते, पण जरा कल्पना करा की हा साप तुमच्या बेडवर रेंगाळताना दिसला तर काय होईल? वास्तविक, सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक धोकादायक साप बेडवर तोंडात चार्जर घेऊन रेंगाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे आणि त्यात दिलेले कॅप्शन असे लिहिले आहे – "उन्हाळ्यात सुरक्षा चेतावणी. एसी रूममध्ये काळजी घ्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक साप ब्लँकेट आणि उशीमध्ये लपलेला दिसत आहे, जो चार्जर केबलला तोंडाने चावत आहे. तुमच्या सभोवतालच्या गोष्टी नेहमी दोनदा तपासा" हा व्हिडीओ अनेकांनी पहिला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
व्हिडीओ पाहून असे दिसते की, सापाने मोबाईल फोन चार्जरला आपले भक्ष्य मानले आहे, त्यामुळे चार्जरची केबल तोंडात दाबून तो चावण्याचा प्रयत्न करत आहे. उन्हाळ्यात केवळ उष्णतेच्या लाटेपासूनच नव्हे तर काही रांगणाऱ्या प्राण्यांपासूनही काळजी घेण्याची गरज आहे, असा संदेश कॅप्शनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. कारण कधीकधी ते थंडपणाच्या शोधात घरात किंवा खोल्यांमध्ये प्रवेश करू शकतात. व्हिडिओ पाहून एका यूजरने प्रतिक्रिया दिली आणि लिहिले - भाऊ चार्जर घेण्यासाठी आला आहे, त्याचा चार्जर खराब होईल, तर दुसऱ्याने लिहिले - साप चार्ज करत आहे.