Viral Video: कोर्टाच्या वर्च्युअल सुनावणीदरम्यान व्यक्ती करु लागला शेविंग, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch It)
Viral Video (Photo Credits-You Tube)

Viral Video: केरळ हायकोर्टाकडून वर्च्युअल सुनावणी पार पडत होती. त्याचवेळी अचानक एका व्यक्ती शेव करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. कोविड19 च्या परिस्थितीमुळे शासकीय काम ठप्प होण्यासह कोर्टाची सुनावणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ककेली जात आहे. अशातच वर्च्युअल सुनावणीदरम्यान विचित्र घटना सुद्धा यापूर्वी आणि आता समोर आली आहे. व्यक्ती बाथरुम मध्ये फिरता फिरता सुनावणीला उपस्थिती राहिल्याचे पाहून नागरिकांकडून त्याची मजा घेतली जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, व्यक्ती शेव करताना दिसून आला. हे प्रकरण 17 जानेवारीचा असून न्यायाधीश वीजी वरुण यांच्या समोर वर्च्युअल सुनावणी सुरु असताना तो तेथे होता. व्हिडिओमध्ये असे ही दिसून येते की, व्यक्ती बाथरुममध्ये फिरत आहे. असे वाटते की, तो आताच झोपून उठला आहे.(Thane: मुंब्रा येथे भरधाव स्कूटरवर सहा अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट; पोलिसांकडून वडील व मुलावर गुन्हा दाखल Watch Video)

Watch Viral Video:

यापूर्वी एक व्यक्ती शर्टाशिवाय कॅमेरा सुरु ठेवून सुनावणी ऐकत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला होता. त्या व्यक्तीला अशा पद्धतीत पाहिल्यानंतर कोर्टाने प्रत्येकाने मर्यादेने वागावे असे आवाहन केले होते.