Video of Elephant Seemingly Dancing | @ParveenKaswan

सोशल मीडीयामध्ये सध्या एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यामध्ये दोन मुली भरतनाट्यम नृत्य करताना त्यांच्या मागे एक हत्ती देखील त्यांच्याप्रमाणे थिरकण्याचा प्रयत्न करत होता. नेटकर्‍यांना या हत्तीच्या अंदाजाचं कौतुक वाटत आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि शेअर चा वर्षाव केला आहे. Indian Forest Service officer Parveen Kaswan यांनी देखील या झपाट्याने शेअर होत असलेल्या व्हिडिओ वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते हा व्हिडिओ मजेशीर वाटत असला तरीही हत्ती तणावात असल्याने असं करत असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडीया मध्ये अनेक युजर्सनी मुलींच्या मागे एका पोलला बांधलेला हत्ती देखील त्यांच्याप्रमाणे हलताना दिसत होते. नेटकर्‍यांना वरकरणी पाहता हा हत्तींचा त्या मुलींप्रमाणे नाच करतानाचा व्हिडिओ वाटत आहे. यावे 7 लाखापेक्षा अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट, शेअर्स आहेत. अनेकांनी हत्तीचा डांस क्यूट असल्याचं म्हटलं आहे. Elephant Viral Video: मसालेदार पाणीपुरीचा आनंद लुटतांना दिसला हत्ती, व्हिडीओ व्हायरल.   

सोशल मीडीयातील व्हिडिओमागील वास्तव मात्र वेगळंच?

सोशल मीडीयात हत्तीच्या नृत्याच्या प्रयत्नाचं कौतुक होत असलं तरीही वास्तव वेगळं आहे. Indian Forest Service officer Parveen Kaswan यांनी हा हत्ती तणावात असल्याने असं वागत असल्याचं म्हटलं आहे. हा आनंदामधील डांस असू शकत नाही. त्यांनी अजून एक असाच एक व्हिडिओ शेअर करत प्राण्यांना मनुष्याप्रमाणे त्यांच्या नियमांत बसवणं बंद करावं त्यांचे जगण्याचे, वावरण्याचे वेगळे नियम आहेत.

हत्ती हे अनेकदा झुरतात जेव्हा ते तणावात असतात, कंटाळा आला असतो, अनैसर्गिक वातावरणात बंदिस्त असतात तेव्हाही ते असेच वागतात. हे वर्तन, याला stereotypic behaviour म्हणतात. सामान्यतः बंदिस्त हत्तींमध्ये हे दिसून येते ज्यात उत्तेजन किंवा मुक्तपणे फिरण्याची क्षमता नसते, जसे ते जंगलात होते.