Siddhivinayak Mandir Siddhatek Dog| Photo Credits: Facebook/ Arun Limbadia

महाराष्ट्रात अष्टविनायकापैकी एक असलेल्या अहमदनगर येथील सिद्धिटेक मंदिराबाहेरील (Siddhatek Siddhivinayak Temple) एक व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे. यामध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडणार्‍या भाविकांना एक्झिट गेट वर एक भटका कुत्रा शेक हॅन्ड करत असल्याचा, आशिर्वाद देत असल्याचं पहायला मिळालं आहे. आता कोरोनाचं संकट नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू प्रार्थनास्थळ खुली झाली आहेत. त्यामध्ये नववर्षाची सुरूवात असल्याने अनेकजण सध्या मंदिरात दर्शनाला जात आहे. त्यामुळे भाविकांना एक्झिट गेट वर भेटणारा हा कुत्रा सध्या सोशल मीडियात तुफान वायरल झाला आहे. Viral Video: भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई; नंतर काय झालं नक्की पहा.

 

अरूण लिंबाडिया या फेसबूक युजरने सिद्धीविनायक मंदिर सिद्धटेक येथील हा व्हिडिओ पहिल्यांदा सोशल मीडीयामध्ये शेअर केला. बघता बघता दोन दिवसांत त्याच्या व्हीडीओ वर लाईक्स, कमेंट्स आणि शेअरचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. 3 दिवसांत 16 हजार लाईक्स आणी 1.2 k कमेंट्स आहेत. अनेकांना या कुत्र्यांच्या 'क्युटनेस'ची भुरळ पडली आहे.

आशिर्वाद देणारा कुत्रा

कुत्रा हा ईमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. काही विशिष्ट जातीचे कुत्र पाळणं हे ताण-तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर समजलं जातं. त्यामुळे अनेकजण कुत्री, मांजरी घरी पाळतात पण भटके कुत्रे हा अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय असतो. पण सिद्धटेक मंदिराच्या आवारातील हा कुत्रा त्याला अपवाद आहे. त्याचा हसरा अंदाज प्रत्यक्ष मंदिरातील भाविकांना आणि आता नेटकर्‍यांना देखील भावत आहे.