Viral Video: भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई; नंतर काय झालं नक्की पहा
भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जोरदार लढाई (Photo Credits: Twitter)

Viral Video: वन्य प्राण्यांमधील (Wild Animals) लढाया फार सामान्य आहेत. आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी वन्य प्राणी वारंवार एकमेकांशी भांडताना दिसतात. यापूर्वी सोशल मीडियावर प्राण्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ (Fight Between Animals) व्हायरल झाले आहेत. दरम्यान, सध्या इंटरनेटवर आणखी एक मनोरंजक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्याची (Stray Dog) आणि सिंहिणीची (Lioness) भयंकर लढाई सुरू आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं असून एका भटक्या कुत्र्याचा आणि सिंहिणीच्या लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी (Indian Forest Service) प्रवीण कासवान (Parveen Kaswan) यांनी शेअर केला आहे. 1.34 मिनिटांचा हा व्हिडिओ 10 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 163k लोकांनी तो पाहिला आहे. तर 6.7k नेटीझन्सनी या व्हिडिओला पसंती दर्शवली असून 1.4k जणांनी हा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांचा हा व्हिडिओ केवळ आवडला नसून यूजर्स त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. (वाचा - 'या' मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा देतो भाविकांना आशीर्वाद; व्हिडिओ पाहून तुम्ही ही व्हाल आश्चर्यचकीत (Watch Video))

आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, एक भटका कुत्रा न घाबरता भयानक सिंहिंणीसमोर उभा आहे. त्यानंतर या दोघांमध्ये भयंकर भांडण होतं. कुत्रा भुंकतो आणि दोघे एकमेकांना मारण्यासाठी धावतात. परंतु, कदाचित कुत्र्याला हे समजलं असावं की, सिंहिणीसोबत पंगा घेणं आपल्याला जीवावर बेतू शकतं. त्यानंतर कुत्रा मागे हटतो आणि सिंहिणीपासून दूर पळतो. त्यानंतर सिंहिणी तेथे आरामात फिरताना दिसते.