Man Washed Away Video: सर्वांच्या डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेला तरुण, घटना कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ
Man Washed Away | (photo credit- ANI)

मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना आलेल्या महापुरात (Flood) अनेक लोग वाहून जातात. कधी या घटना नागरिकांच्या नजरचुकीने, कधी अपघातामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे घडतात. उत्तराखंड राज्यातील एका जिल्ह्यातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात दिसते की, नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून (Uttarakhand Man Washed Away) गेला आहे. बघायला अत्यंत भयावह अशी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, उत्तराखंड राज्यातील फतेहपूर भागात पावसामुळे आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला. दरम्यान, हा तरुण कोण आहे. कुठला आहे, याबाब काहीच माहिती उपलब्ध नाही. शिवाय त्याचे नावही समजू शकले नाही. प्रशासन सध्या त्याचा शोध घेत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती पूर आलेल्या नदीतून पुलावरुन रस्ता ओलांडताना दिसतो. हा व्यक्ती स्वत:च्या पायाने पूराच्या पाण्यात शिरतो. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका वेगवान की त्याला रस्ता पार करणे अशक्य होते. अखेर तो पाण्यासोबत वाहून जातो. ही घटना इतकी वेगाने घडते की, आजूबाजूच्या लोकांना त्याला सावरण्याची अथवा मदत करण्याची संधीही मिळत नाही. हल्द्वानीचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) मनीष कुमार सिंह यांनी एएनआयला सांगितले की, या तरुणाचा अद्यापही पत्ता लागला नाही. (हेही वाचा, Itarsi: चालत्या रेल्वेमध्ये चढतांना घसरला पाय, आरपीएफ जवानाने केलेल्या कारवाईमुळे वाचले प्राण, पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ)

ट्विट

नागरिकांना पुराच्या पाण्याचा अंदाज अनेकदा येत नाही. त्यामुळे कधी कधी नजरचुकीने तर कधी कधी अतीधाडसाने लोक पाण्यात शिरतात. पाण्याचा प्रवाह वेगाचा आणि अधिक शक्तीने असल्याने माणसाची ताकद त्यापुढे कमी पडते परिणामी ते पाण्यासोबत वाहुून जातात. अनेकदा मोठमोठी वाहने जसे की, दुचाकी, चारचाकी सुद्धा वाहून जातात. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरताना काळजी घ्यावी आणि अधिक सावधगिरी बाळगावी असे अवाहन तज्ज्ञांकडून नेहमीच केले जाते.