उत्तर प्रदेश: माशाच्या शरीरावर 'अल्लाह' लिहिल्याचे दिसल्याने 5 लाखांची बोली
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका तरुणाच्या घरी असलेल्या माशाच्या अंगावर 'अल्लाह' (Allah) लिहिल्याचे दिसून आले आहे. घरात ठेवलेल्या फिश टॅन्कमधील हा मासा असून त्याची आता बोली लावली जात आहे. घटना शामली जिल्हातील कैराना स्थित येथील आहे. येथील रहिवाशी सईद अहमद यांचा मुलगा शबाब अहमद यांने गेल्या काही महिन्यांपूर्वी फिश टॅन्क मध्ये छोटा मासा आणून ठेवला होता. जसा जसा मासा होत गेला तसे त्याच्या अंगावर अल्लाह नाव लिहिल्याचे दिसून आले. हे पाहून शबाब आर्श्चचकित झाला असून ही घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी परसली आहे.

आजूबाजूच्या परिसरातील लोक शबाबच्या घरी मासा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. एवढेच नाही त्याची बोली 5 लाख लावण्यात आली आहे. या अनोख्या माश्यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चचा विषय ठरला आहे. रशिद खान नावाच्या एका व्यक्तीने त्याची बोली 5 लाख रुपये लावली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र शबाब या माश्याची 5 लाखांपेक्षा अधिक बोली कोण लावत आहे याची वाट पाहत आहे. यापूर्वी सुद्धा ईद दरम्यान उत्तर प्रदेशातच एका बकऱ्यावर 5 लाखांची बोली लावण्यात आली होती.(Watch Video: नवी मुंबईत किड्यांचा सुळसुळाट, शरीराला खाज येत असल्याच्या नागरिकांनी केल्या तक्रारी)

तसेच राज्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि महापूर यापासून भोपाळ शहराची सूटका व्हावी या उद्देशाने इथल्या लोकांनी चक्क एका बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणला आहे. होय, पाऊस पडावा यासाठी बेडकांचा विवाह (Frog Marriage) लाऊन देण्याची पूर्वंपार चालत आलेली अवैज्ञानिक प्रथा काही ठिकाणी आजही सुरु आहे. इथल्या मंडळींनी त्यात एक पाऊल पुढे टाकत चक्क बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणण्याचाच प्रताप केला.