नवी मुंबई परिसरातील सीवूड्स विभागात काही दिवसांपासून एक विशिष्ट प्रकारच्या किड्यांनी उच्छाद मांडला आहे. इतकेच नव्हे तर किड्यांनी इथल्या नागरिकांना अगदी सळो की पळो करून सोडले आहे.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार हे किडे सीवूड्स रेल्वे स्थानकापासून सेक्टर ५० च्या दिशेने नवी मुंबई महानगर पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहेत. तसेच या परिसरातील रस्ते, तेथील सोसायटींच्या भिंती आणि झाडांवर हे किडे हजारोंच्या प्रमाणात दिसून आले आहेत.
पहा महाराष्ट्र टाइम्स ने शेअर केलेला व व्हिडिओ
VIDEO: नवी मुंबईत किड्यांचा उच्छाद; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट pic.twitter.com/IX3YHXu54C
— Maharashtra Times (@mataonline) October 10, 2019
महत्त्वाचे म्हणजे हे या परिसरातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी महानगर पालिकेकडे केलेल्या तक्रारींनुसार हे किडे अंगावर पडताच शरीराला खाज येते. आणि म्हणूनच वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली व अग्निशमन दलाच्या मदतीने या ठिकाणी पाणी फवारणीही करण्यात आली आहे.
या किड्यांविषयी तूर्तास समजलेली माहिती म्हणजे हे किडे ह्याब्लिआ कॅटर पिलर म्हणजे सुरवंट आहेत व ते जास्त करून खाडीत खारफुटीवर आढळतात.