
सिंगापूर (Singapore) शहरात ली ची कि नामक एक चोराला पोलिसांनी लॉक डाऊन चे नियम मोडून चोरी करत असताना अटक केली आहे. हा महाभाग काही सोने, चांदी, पैसे अशा गोष्टींची नव्हे तर अचानक अंडरवेअर्सची चोरी (Underwear Thief) करत होता. त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे ही काही त्याने अशा प्रकारची चोरी करण्याची पहिलीच वेळ नाही तर याआधी 2018 पासून त्याला जवळपास 30 घरांमधून महिलांचे अंतर्वस्त्रे (Lingerie) चोरताना पकडले गेले आहे. या चोराला अंतर्वस्त्र चोरण्याचा विचित्र छंद आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता पोलिसांना 100 हून अधिक ब्रा आढळले होते अशी माहितीही मिळत आहे. चीन ने पाकिस्तानला मदतीच्या नावावर दिला धोका? COVID 19 चे संकट असताना N95 च्या ऐवजी पाठवून दिले Underwear Mask, वाचा सविस्तर
गेल्या महिन्यात अंडरवेअर चोरीच्या आरोपावरून 39 वर्षीय चोराला अटक झाली होती. एका घरात घुसून त्यांच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये वळत घातलेले ब्रा आणि पॅन्टीज तो चोरत होता, त्याचवेळी त्याला घरमालकांनी त्याला शोधून काढले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपले सेक्श्युअल फॅंटसीज पूर्ण करण्यासाठी तो अशा प्रकारची चोरी करत होता असेही त्याने वकिलांना सांगितले.
दरम्यान, या चोराला चोरीसोबतच लॉक डाऊनचे नियम विनाकारण मोडल्याचा गुन्ह्यातूनही शिक्षा होणार आहे. ली ची याला योग्य तो दंड आकारला जाईल आणि गुन्ह्याची शिक्षा सुद्धा केली जाईल असे कोर्टाने सांगितले आहे. दुसरीकडे, सिंगापूर मध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच सर्व काही बंद करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉक डाऊन मध्ये अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडलेल्यांना कठोर शिक्षा सुनावली जात आहे.