बुर्ज खलिफा (Photo Credits-ANI)

UAE: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 151 व्या जयंती निमित्त सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर प्रत्येकाने महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील महत्वाचा असा अहिंसेच्या मार्गा सर्वजण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभुमीवर दुबईतील जगप्रसिद्धा इमारत बुर्ज खलिफा वर महात्मा गांधी यांना जयंती निमित्त खास अंदाजात आदरांजली दिली आहे. गांधीजींसह भारताच्या तिरंग्याची रोषणाई सुद्धा बुर्ज खलिफावर दिसून आली. त्यामुळे बुर्ज खलिफा आज तिरंग्याच्या रंगात रोषणाईमध्ये झळकल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. तर युएई मधील सर्वात मोठी उंच इमारतींपैकी एक अशी बुर्ज खलिफाची इमारत आहे.

दुबईतील या बुर्ज खलिफावरील क्षणांचा व्हिडिओ समोर आला असून ANI यांनी ट्विट केला आहे. गांधी जयंती निमित्त त्यांना आदरांजली देण्यासह बुर्ज खलिफाची संपूर्ण इमारत तिरंग्याच्या रोषणाईने सजलेली व्हिडिओ मधून दिसून येत आहे. तसेच The Feature Depends On What You Do Today सारखे अन्य काही कोट्स गांधीजींच्या चलचित्रासह त्यावर झळकत आहे.(Gandhi Jayanti, Lal Bahadur Shastri Jayanti 2020 निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांचे ट्विटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!)

दरम्यान, बुर्ज खलिफा महात्मा गांधी यांच्या प्रत्येक जयंती निमित्त तिरंग्याने सजवली जाते. सजवल्यानंतर बापूंना आदरांजली दिली जाते.  तर गेल्या वर्षात सुद्धा अशाच पद्धतीने बुर्ज खलिफाची इमारत रोषणाईने झगमटून उटल्याचे दिसले होते. बुर्ज खलिफा ही दुबईतील जगप्रसिद्ध इमारत असण्यासह त्याची उंची 829.8 मीटर आहे. जी दुबईची शान म्हणून ओळखली जाते.