Gandhi Jayanti, Lal Bahadur Shastri Jayanti 2020 निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांचे ट्विटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!
President Ram Nath Kovind, Prime Minister Narendra Modi. (Photo Credits: PTI, ANI)

आज 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी (Mahtma Gandhi) आणि लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा जन्मदिवस. या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गांधींची आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे. ट्विटच्या माध्यामातून खास संदेश लिहित नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांच्या देशसेवेसाठी, स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. (गांधी जयंती निमित्त त्यांचे मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp वर शेअर करत वंदन करुया बापूजींच्या स्मृतीला)

गांधी जयंती निमित्त केलेल्या ट्विट मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लिहिले, "गांधी जयंती निमित्त कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धा-सुमन अर्पण करतो. सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा त्यांनी दिलेला संदेश समाजात समरसता निर्माण करुन सर्व विश्वाला कल्याणाच्या मार्गाकडे नेतो. गांधीजी संपूर्ण मानवतेचे प्रेरणा स्त्रोत आहेत. गांधी जयंती निमित्त पुन्हा एकदा संकल्प करुया की, आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर आपण चालू. राष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव समर्पित राहू. तसंच स्वच्छ, समृद्ध, सशक्त आणि समावेशी भारताच्या निर्माणासाठी गांधीजींच्या स्वप्नांना साकार करु."

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट:

गांधी जयंती निमित्त पीएम मोदी यांचे ट्विट:

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पीएम मोदी यांचे ट्विट:

राजनाथ सिंह यांचे ट्विट्स:

अमित शाह ट्विट्स:

राहुल गांधी ट्विट:

दरम्यान, आज गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजघाट येथील गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी देखील राजघाट येथील समाधीला भेट देत आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विजयघाट येथील समाधीस्थळी भेट देत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्याचबरोबर राजघाट येथील महात्मा गांधी यांच्याही समाधीचे दर्शन घेतले.