#ThrowbackThursday: रतन टाटा यांनी शेअर केला तरुणपणीचा लूक, भल्या भल्या अभिनेत्यांना ही मागे टाकेल; एकदा पहाच
Ratan Tata Shares #ThrowbackThursday Post (Photo Credits: @ratantata/ Instagram)

भारतातील अग्रगण्य उद्योग पतींमधील प्रसिद्ध नाव रतन टाटा (Ratan Tata) यांनी काल आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट वरून एक असा फोटो पोस्ट केला आहे की जो पाहून नेटकरी देखील संभ्रमात पडले होते. हा फोटो रतन यांच्या तरूणपणातील आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी तुम्ही एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड स्टारला सुद्धा मागे टाकतील इतके वेगळे आणि हॅण्डसम दिसत आहात, जर हा फोटो तुम्ही पोस्ट केला नसता तर तुम्हाला ओळखणे सुद्धा शक्य झाले नसते असे म्हंटले आहे. खरंतर अलीकडेच इंस्टावर पदार्पण केल्यापासून अनेकदा रतन टाटा हे चर्चेत असतात, अनेक प्रेरणादायक किस्से आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर करताना अनेकांना प्रेरणा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र गुरुवारी रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर आपला नेहमीपेक्षा वेगळाच फोटो शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी हा फोटो बुधवारी शेअर करणार होतो. पण नंतर मला कळलं की थ्रोबॅक फोटो गुरुवारी शेअर केला जातो. यासाठीच माझ्याकडून लॉस एंजेलिसमधील हा थ्रोबॅक फोटो”. या फोटोला त्यांनी #ThrowbackThursday असा हॅशटॅग दिला आहे.या फोटोला काही तासातच लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा तर पाऊस पडत आहे. (मिताली बोरुडे : राज ठाकरेंची सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही!)

रतन टाटा इंस्टाग्राम पोस्ट

रतन टाटा यांचा हा तरुणपणातील फोटो आहे. गुजरातमधील सूरत येथे 28डिसेंबर 1937रोजी जन्मलेले रतन टाटा आज 82 वर्षांचे आहेत. हा फोटो त्यांच्या आठवणींना उजाळा आणि नेटकऱ्यांसाठी आश्चर्यचा धक्का आहे