ठाणे येथील रेल्वेच्या खांबावर माथेफिरु चढला, पहा व्हिडिओ
Thane Station (Photo Credits-Saamana Online)

मध्य रेल्वेस्थानमधील ठाणे (Thane) येथे एक माथेफिरु रेल्वेच्या खांबावर चढल्याचा प्रकार आज संध्याकाळच्या सुमारास पाहायला मिळाला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या माथेफिरुला पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

सामना ऑनलाईने दिलेल्या वृत्तानुसार, ओव्हरहेडच्या खांबावर एक माथेफिरु चढल्याची माहिती मिळताच त्याचा वीजपुरवठा बंद करण्यात यावा अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या माथेफिरुला खाली उतरवले. माथेफिरुच्या अशा प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले होते.(मुंबई लोकलमध्ये चढण्यासाठी जेव्हा मुंबईकरांना सुपरमॅन व्हावे लागते, पाहा मजेशीर व्हिडिओ Watch Video)

मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवासी अधिकच संताप व्यक्त करताना दिसून येतात. तसेच ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. तर काही दिवसांपूर्वी सुद्धा रेल्वेस्थानकात एका व्यक्तीने ट्रेनमध्ये चढण्यासाठी सुपरमॅनसारखा येत लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायर झाला होता.