Stand by Me Doraemon 2: लग्नबंधनात अडकले Nobita आणि Shizuka; इमोशनल झाले चाहते, सोशल मिडियावर #Nobita ट्रेंडिंग 
Nobita Shizuka wedding (Photo Credits: Twitter)

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कार्टून शो पाहायला आवडतो? जर याचे उत्तर 'होय' असे असेल तर तुम्ही, 'डोरेमॉन' (Doraemon) कार्टून शोचे नाव नक्कीच ऐकले असेल. डोरेमॉन हा भारतातील सर्वाधिक पाहिलेला कार्टून शो आहे. या शोमध्ये, डोरेमॉन, नोबिता (Nobita), शिझुका (Shizuka), सुनिओ आणि जियान या कार्टून पात्रांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. गेले कित्येक महिन्यांपासून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असलेल्या डोरेमॉनना आपली मैत्रीण शिझूका किती आवडते ते आपल्याला माहित असेलच. लवकरच, डोरेमॉनचा पुढील चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये नोबिता आणि शिझुकाच्या लग्नाचा कार्यक्रम दर्शविला जाईल.

2014 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल 'Stand by Me Doraemon 2' या नावाने असणार आहे. पहिला भाग नोबिता आणि डोरेमॉनची पहिली भेट आणि त्यांच्या एडव्हेंचर बाबत होता, तर दुसरा भाग नोबिताची लहानपणाची मैत्रीण असलेल्या शिझुकासोबतच्या त्याच्या लग्नाबद्दल असेल. हा चित्रपट जपानमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये प्रदर्शित झाला आहे आणि फेब्रुवारी 2021 मध्ये इंडोनेशियामध्ये प्रदर्शित होईल. नोबिता आणि शिझुकाच्या लग्नाची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर #Nobita ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे. (हेही वाचा: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे Google वर सेलिब्रेशन; 'India National Cricket Team' सर्च केल्यास दिसेल तिरंगी आतिषबाजी)

डोरेमॉनच्या दर्शकांना हे चांगले ठाऊक आहे की नोबिताला त्याची बालमैत्रीण शिझुका आवडते आणि बर्‍याच भागांमध्ये दोघांना नवरा-बायको म्हणून दाखवले आहे. पण आता या दोघांचे लग्न झाल्याचा चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. नोबिता आणि शिझुका यांच्या लग्नाबाबत चाहते भावनिकही झाले आहेत. सीबीआय पिक्चर्सने ही बातमी ट्विटरवर शेअर केली असून, नोबिता आणि शिझुकाचे लग्न सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. या कार्टूनच्या लाखो चाहत्यांनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.