Google celebrates Team India's win (Photo Credits: Twitter & Google)

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टेस्ट सामन्यात भारतीय टीमने (Indian Cricket Team) दमदार विजय मिळवत कसोटी मालिका 2-1 अशी जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञ टीम इंडियाची वाहवा करत आहेत. त्यात गुगलच्या कौतुकाचीही भर पडली आहे. गुगल इंडियाच्या (Google India) ऑफिशियल अकाऊंटने एक ट्विट करत क्रिकेटप्रेमींना छोटंस गिफ्ट दिलं आहे. गुगलच्या वेबसाईटवर जावून 'India National Cricket Team' असे सर्च केल्यास तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला व्हर्च्युअल आतिषबाजी दिसेल. (IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय)

Gabba येथे झालेल्या चौथ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑल राऊंड परफॉरमन्स दाखवत भारतीय संघाने मोठा विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इंनिंगमध्ये टी. नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करुन ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये 369 धावांचा पाठलाग करताना शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या 131 धावांच्या दमदार भागीदारीमुळे भारत ऑस्ट्रेलिया संघाच्या धावसंख्येजवळ पोहचला. तिसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज याने 5 गडी बाद करत तर चौथ्या इनिंगमध्ये शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या दमदार 89 धावांच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजय पटकावला.

Google India Tweet:

(हे ही वाचा: India vs England Test Series: भारतीय संघाची घोषणा; कोहली, इशांत आणि हार्दिक पांड्या खेळणार तर पृथ्वी शॉ संघातून बाहेर)

32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला Gabba येथे हरवून भारताने इतिहासात आपले नाव कोरले आहे. 2018 मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कसोटी मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. यंदाच्या वर्षी 2-1 असा विजय मिलवत भारताने मालिका आपल्या खिशात घातली. या ऐतिहासिक विजयानंतर भारत आता इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून  सुरु होणाऱ्या इंग्लंडच्या भारत दौऱ्यामध्ये 4 कसोटी सामने, 5 टी-20 सामने आणि 3 वन डे सामने होणार आहेत.