सापाशी (Snakes) बेजबाबदारपणे वर्तन करणे किती भयानक आणि तितकेच जीवघेणे असू शकते, हे तर आपण जाणताच. तरीही लोक असे वर्तन करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Snake Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत दिसते की एक भलामोठा साप कदाचित त्याला छोटा अजगरही म्हणता येईल एका पठ्ठ्याने हाताने उचलून बाजूला ठेवला. रस्त्यावर घडलेली ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित (Spine Chilling Viral Video) केली आहे.
भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ धक्कादायक आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक माणूस रस्त्याच्या मधोमध विसावलेल्या एका मोठ्या सापाजवळ येतो. मग हा माणूस तो सरपटणारा प्राणी त्याच्या हातांनी उचलतो आणि त्याला बाजूला करतो. भलामोठा साप मग अंधारात नाहीसा होतो. "त्यावर तुमची मते.
आयएफएस अधिकारी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटरवर केलेल्या या व्हिडिओच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वन्यप्राण्यांच्या अधिवासात जाणे आणि त्यांना त्रास देणे किंवा रस्ता अपघातापासून वाचवणे, हे सर्वच धक्कादायक आहे. व्हिडिओ दक्षिण भारतातील आहे. (हेही वाचा, Snake News: धामण समजून मण्यार पकडला; सापाबद्दलच्या अज्ञानातून केलेल्या धाडसाने तरुणाचा जीव गेला; वर्धा येथील घटना)
ट्विट
Your views on it. Going in wildlife habitat & disturbing or saving it from road accident. Video is from important wildlife habitual in south India. @BoskyKhanna pic.twitter.com/7W110lg3CD
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 30, 2022
या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. काहींनी नागाला रस्त्यावरून हटवल्याबद्दल त्या माणसाचे कौतुक केले आहे. तर काहींनी वन अधिकाऱ्यांना न कळवता वन्यप्राण्यांना त्रास दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे