प्रेमात आणि युद्धात (Love And War) काय काय केले जाईल काहीच सांगता येत नाही. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागर (Guhagar ) येथील श्रृंगारतळी (Shrungartali) बाजारात याचाच प्रत्यय (Guhagar Love Story) आला. एका तरुणाचे एका महिलेवर एकतर्फी प्रेम होते. तिला भेटण्यासाठी म्हणून या तरुणाने भलतीच शक्कल लढवली. पण बाजारातील काही सजग नागरिक आणि पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. परिणामी या तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाची चांगली उलटतपासणी घेतली. त्यामुळे 'खाया पिया कुछ नहीं.. गिलास तोडा बारा आणा' अशीच काहीशी अवस्था या तरुणाच्या वाट्याला आली.
प्राप्त माहितीनुसाह हा तरुण चिपळून शहरानजिकच्या एका परिसरात राहतो. तरुणाचे नाव समजू शकले नाही. परंतू, एका महिलेला भेटण्यासाठी या तरुणाने चक्क वेशांतर केले आणि तो चक्क बुरखा घालून श्रृंगारतळी येथील बाजारात आला. कथीत प्रेयसीला भेटण्याचा श्रृंगार त्याला फारसा जमला नाही. परिणामी त्याच्या बाजारातील हालचाली भलत्याच संशयास्पद जाणवू लागल्या. एका स्थानिक राजकीय नेत्याच्या मुलाला प्रथम त्याचा संशय आला. त्यानंतर आजूबाजूच्या बाजारकरी नागरिकांनाही या बुरखादारी व्यक्तीबद्दल संशय वाटला. त्यामुळे नागरिकांनी त्याच्याकडे विचारणा केली. नागरिकांनी विचारणा करताच प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तो धूम पळाला. (हेही वाचा, एकाच मुलावर दोन तरुणीचे जडले प्रेम, समोर येताच सुरू झाली मुलींची हाणामारी, भांडण पाहून मुलाने काढला पळ)
नागरिकांच्या चौकशीला उत्तरे न देता या महाभागाने घटनासथळावरुन पळ काढला. त्यामुळे त्याच्याबाबतीतला संशय अधिकच वाढला. नागरिक आणि तरुणांनी त्याला पाटलाग करुन पकडले. त्याला पकडताच त्याचा बुरखाही फाटला. बुरख्यातली व्यक्ती बाई नसून बाप्या निघाला. त्यामुळे नागरिकांचा संशय अधिक बळावला. त्यामुळे त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपले एका महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. कोणाला संशय येऊ नये यासाठी आपण वेशांतर करुन तिला भेटायला आल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.