अनेकांना साहसी गोष्टी करण्याची आवड असते. सुट्ट्यांसाठी बाहेर गेल्यास नवनवीन गोष्टी ट्राय करण्याचा विचार जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो. अशावेळी ट्रेकिंग, हायकिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग इत्यादी अनेक गोष्टी करण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु या खेळांमध्ये जितकी मजा असते, तितकीच अपघाताची भीतीही राहते. गुजरातहून (Gujarat) सुट्टी व्यतीत करण्यासाठी दीवला (Diu) गेलेले जोडपे अशा साहसी खेळापाई मोठ्या अपघाताचे बळी ठरले. गुजरातमध्ये राहणारे पती-पत्नी रविवारी सकाळी नागोवा समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग (Parasailing) करताना खाली पडले.
बोटीला बांधलेली दोरी अचानक तुटल्याने दोघेही उंचावरून समुद्रात पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि दोघेही सध्या सुरक्षित आहेत. एका बातमीनुसार, अजित कठड हे पत्नीसोबत दीवमधील नागोवा बीचवर पॅरासेलिंग करत होते आणि त्यांचा भाऊ राकेश कठाड त्या लोकांचा व्हिडिओ बनवत होता. दोघेही पॅराशूटच्या सहाय्याने हळू हळू वर गेले. उंचावरून समुद्राचे पाणी ते दृश्य एन्जॉय करताना अचानक त्यांच्या बोटीला बांधलेली पॅराशूटची दोरी अचानक तुटली. त्यानंतर ते पाण्यात पडले, मात्र दोघेही सुखरूप आहेत.
@VisitDiu @DiuTourismUT @DiuDistrict @VisitDNHandDD
Parasailing Accident,
Safety measures in India,
and they said very rudely that this is not our responsibility. Such things happens. Their response was absolutely pathetic.#safety #diu #fun #diutourism #accident pic.twitter.com/doN4vRNdO8
— Rahul Dharecha (@RahulDharecha) November 14, 2021
राकेश कठाड यांनी सांगितले, ‘मी त्यावेळी बोटीवर होतो आणि भाऊ आणि वहिनीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच मी घाबरलो, त्यावेळी नक्की काय करावे आणि कशी मदत करावी हे समजत नव्हते. एवढ्या उंचावरून ते दोघेही समुद्रात पडले आणि मी काही करू शकलो नाही.’ (हेही वाचा: शौचालयाचा वापर करत असताना व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावला किंग कोब्रा, जाणून घ्या त्यानंतर काय घडले)
त्याचवेळी, पाम अॅडव्हेंचर आणि मोटर स्पोर्ट्सने जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले. अॅडव्हेंचर कंपनीचे मालक मोहन लक्ष्मण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, अशा प्रकारची दुर्घटना तीन वर्षांत प्रथमच घडली आहे. मात्र, आमच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी तात्काळ या जोडप्याची सुटका केली. दुसरीकडे अजित काथड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अपघातासाठी पॅरासेलिंग कंपनीच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे.