अमेरिकेच्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीच्या तोंडातून चक्क 2.50 लाख रुपयांचा मोती निघाल्याची अजबगजब घटना घडली आहे. तर तो सर्वात महाग मोती असल्याचे सिद्ध झाले आहे.
रिक अॅन्टॉश (Rick Antosh) असे या व्यक्तीचे नाव आहे. रिक त्यांच्या मित्रासोबत अमेरिकेतील एका Oyster Bar मध्ये जेवणासाठी गेले होते. या हॉटेलमध्ये शिपल्यांचे जेवण खूप प्रसिद्ध आहे. जेवताना रिक यांच्या तोंडातून काहीतरी दगडासारखी विचित्र गोष्ट बाहेर आली. त्यानंतर रिक यांनी हॉटेलच्या मॅनेजरला जेवणाबाबतीत असा प्रकार घडल्याने तक्रार केली. त्यावेळी मॅनेजरने रिक यांची माफी मागत असे यापूर्वी कधीच झाले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर रिक यांनी जेवणामध्ये मिळालेला मोती जपून ठेवला. बाजारामध्ये त्या मोतीची किंमत माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी तो एका दुकानदाराला दाखविला. त्यावेळी दुकानदाराने त्याची किंमत 2-4 हजार डॉलर म्हणजेच 1.50- 2.50 लाख रुपये असल्याचे समजले. तसेच रिक यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील हे अप्रतिम जेवण असल्याचे सांगितले.